Bas Ek Baar
1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (No Ratings Yet)
Loading...Loading...
Utility :
Brand awareness, new product launch, tasting, survey, stock clearing sale, digital gift coupon
Category :
Economy Schemes
Language :
Marathi, Hindi, English
Business Type:
Mid-size shop, small manufacturing unit
Product Value :
INR. 45,000 Only For One Month
Intensity & Scope :
Very High, Short Term, Strong Feedback Mechanism
Preservative value :
01 or 02 days
Personalisation of Content:
Personalization of content is possible with respect to categorization

होऊ दे खर्च, प्रॉडक्ट आहे घरचं

 ४५००० रुपये एकावेळेस खर्च करण्यासाठी

एखादं नवीन प्रॉडक्ट launch करायचंय, किंवा एखाद्या प्रॉडक्टला नव्या स्वरूपात मार्केटमध्ये आणायचंय ? त्यासाठी महिन्याभरात जास्तीत जास्त लोकांना हलवायचंय ? मग ‘बस एक बार’ मोबाईल मिडीयावर खर्च करा आणि बारकाईने रिझल्ट्स अनुभवा.
आपण असं गृहीत धरू की तुम्ही साबण पावडर किंवा फारशी स्वच्छ करणाऱ्या फ़िनाईलचे उत्पादक आहात किंवा तुमचा प्यायचा थंड ऑरेंज सोडा आणि कोकम सोडा खूप पॉप्युलर आहेत. आता तुम्हाला एका नव्या कॅटेगरीमध्ये शिरायचंय. अश्यावेळी मोबाईल मिडीयाइतकं कुणीही तुमच्या उपयोगी पडणार नाही हे आम्ही खात्रीने सांगतो. आणि हे सिद्ध करण्यासाठी काही टेस्ट स्टडी देतो
१) नवीन कपडे धुवायचा साबण तुम्ही बाजारात आणणार. साहजिकच सुरुवातीला तुम्ही फ्री sampling करणार. मग तुमच्या आधीच्या कस्टमर्ससोबत मोबाईलवरून जर तुम्ही ही अनाउन्समेंट केली तर ? लक्षात घ्या प्रॉडक्ट डिझाईन स्टेजपासून तुम्ही तुमच्या जुन्या ग्राहकाला हाताशी धरू शकता.
२) मोबाईल रिसर्च किंवा सर्व्हे. लोकांना कळू न देता, आणि अर्थात त्यांची फसवणूकही न करता क्रिएटिव्हजच्या माध्यमातून तुम्ही नेमकी गरज ओळखू शकता. काळाच्या सोबत राहण्यासाठी मोबाईलवर केलेले हे उद्योग खूप उपयोगी पडतात.
३) गरज आणि आकर्षण. आता हे आजवर कुणालाही छातीठोकपणे सांगता आलेलं नाही, की तुमचं प्रॉडक्ट हे ग्राहकाची निव्वळ गरज आहे की आकर्षणामुळे निर्माण झालेली गरज आहे. अक्षरश: एका महिन्यात तुम्ही हे ओळखू शकता. मात्र त्यासाठी लक्षपूर्वक, अभ्यास करून मोबाईल, मनोरंजन आणि सोशल मिडियाचा वापर करावा लागेल.
४) न चालणारं प्रॉडक्ट नव्या स्वरूपात मार्केटमध्ये आणणं आजच्या काळात किते अवघड आहे हे न बोललेलंच बरं ! अश्यावेळी सिलेक्टिव्ह लोकांच्या हातात ते पडेल अशी व्यवस्था मोबाईलवरून जर केली गेली, उदाहरणार्थ, किचन Trolley हे प्रॉडक्ट असेल आणि बिल्डरच्या मदतीने मोजक्या दहा लोकांना जरी फोनवरून हे प्रॉडक्ट तुम्हाला घराच्या पझेशन बरोबर फ्री मिळणार आहे आणि त्यासाठी चकाचक, आकर्षक, खास तुमच्यासाठी म्हणून जर डेमो क्लिप पाठवली तरी ती पुढे किती forward होईल याची कल्पना तुम्ही करूच शकता.

.

थोडक्यात सांगायचं तर ४५००० ही नव्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये soft launch करण्यासाठी खूप अजस्त्र रक्कम नाही, हे तुम्हीही मान्य कराल. साधारणत: एका महिन्यात तुम्ही तुमच्या डेटाबेसकडून नव्या प्रॉडक्टबद्दलची संपूर्ण केस स्टडी करून घेऊ शकता. यासाठी मुख्य गरज आहे ती तुमच्याकडे व्यवस्थित अरेंज केलेला डेटाबेस असण्याची आणि अर्थातच आम्ही जे मोबाईल क्रिएटिव्ह देऊ ते जास्तीत जास्त नव्या लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ४५००० रुपयांव्यतिरिक्त डीस्ट्रीब्युशन बजेट असण्याची.

फ्रेश आयडिया रोज रोज आणणार तरी कुठून ?

विचार करा की आजवर एकदा तरी तुम्ही तुमच्या ग्राहकांनाच तुमची जाहिरात बनवायला सांगितलीय का ? नाही ना ? मग ही सुवर्णसंधी वाया का घालवायची ? मोबाईल मिडियावरून एक भन्नाट स्पर्धा आयोजित करा आणि ग्राहकांनाच सांगा की, जो आमच्या नवीन laptop च्या दुकानासाठी किंवा सिझनच्या पहिल्या हापूस आंब्यासाठी बेस्ट गाणं लिहून देईल त्याला एक १ TB ची हार्ड-डिस्क फ्री किंवा एक आंब्याची पेटी फ्री. तुमच्या अपेक्षेपेक्षा हजारपट मोठा response येऊ शकतो. विचार करा तुम्हाला नवीन क्रिएटिव्ह मिळालं, ग्राहकांना नवं काहीतरी मनोरंजन आणि फायदा मिळाला आणि तुमची पब्लिसिटी झाली ती वेगळीच. थोडक्यात मोबाईलमुळे तुम्हाला लोकांच्या आवडीनिवडीही कळाल्या आणि रिसर्चही झाला. रिटेल मार्केटमध्ये यापेक्षा अजून कोणत्या चमत्काराची तुम्ही करणार ?

Likes(0)Dislikes(0)

Comments are closed.