Creative Fountain
1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (2 votes, average: 7.50 out of 5)
Loading...Loading...
Utility :
-----
Category :
Exclusive Schemes
Language :
Marathi, Hindi, English
Business Type:
SME, Mid Size Manufacturers
Product Value :
INR. 1,20,000 Only For One Year
Intensity & Scope :
----
Preservative value :
----
Personalisation of Content:
Not Possible

तुम्ही १ लाख २० हजार रुपयात कायकाय करू शकता ? आय मीन, प्रसिद्धीसाठी किंवा मार्केटिंगसाठी ?

बऱ्यापैकी वर्दळ असलेल्या चौकात होर्डिंग घ्याल तर आठवडाभर / दोन आठवडे टिकेल. बऱ्यापैकी खप असल्याचं सांगणाऱ्या एखाद्या न्यूजपेपर मध्ये ६ बाय ८ ची एक जाहिरात द्या, दोन तीन राउण्डमध्ये पैसे ओम फट स्वा: ! टॉपच्या मराठी टीव्हीवर जाहिरात देऊन बघाच ! खर्च तुमचा तुम्हालाच कळेल. रेडिओवर जाहिरात द्यायचीच असा हट्ट केलातच तुम्ही, तर मग फार फार तर महिनाभर ‘वाजवून’ घ्या तुमचं प्रॉडक्ट. चौकाचौकात पॅम्फ़्लेट वाटायचं म्हणताय ? ३ किंवा चार वेळा १५ मुख्य चौकात १० पोरं लावा आणि प्रत्येकाला २०० चं टार्गेट द्या आणि बघा हिशोब कुठे जातो ते ! आता शेवटचा इफेक्टिव्ह पर्याय, पेपरमधून पॅम्फ़्लेट टाका ! याचं कसंय की, प्रकरण जर जमलं तर बेस्ट नाही जमलं तर मग मात्र, सगळेजण करतात म्हणून मग….

Changing Time

तर हे सगळं असं आहे, आणि खरंतर थोड्याफार फरकानं असंच आहे. नागपूर पासून ते अंधेरी पर्यंत आणि मालवणपासून ते पार नंदुरबारपर्यंत. पण रुळलेल्या, मळलेल्या वाटा समाज काही फार दिवस वापरत नसतो. सतत नवीन प्रयोग चालूच असतात. गिऱ्हाईक शोधणं, मिळवणं, टिकवणं आणि मग वाढवणं.

आज स्मार्टफोन सगळ्यांकडे आलेच्चेत. इंटरनेटही आलंय. आणि या सगळ्यांसोबत जाहिरातींचा अक्षरश: पाउसही आलाय. ग्राहक बिचारा हवालदिल झालाय. जिकडे पहावं तिकडे हे विकत घ्या, ते स्वस्तात आहे, याची स्कीम, त्याचं नवं प्रॉडक्ट… थोडक्यात पूर्वी दगडातही देव दिसायचा… आता प्रॉडक्ट दिसतं. न जाणो हे वाचून एखादा खरंच दगडात प्रॉडक्ट ठेवेलही कदाचित.

तर, याच मोबाईल मिडीयाने जी क्रांती केलीये त्यामुळे व्हॉटसअप, फेसबुक, ईमेल हे शब्द जणू श्वास झालेत. जो उठतो तो व्हॉटसअपवर अपडेट टाकतो. फेसबुकवर पोस्ट हाणतो.

For Generation Next – Speed, Scale, Service

असो… या सगळ्यातून एक नवी गरज तयार झाली, आणि ती म्हणजे टीव्ही, रेडिओपेक्षाही कमी वेळेत आपलं प्रॉडक्ट समजावून सांगण्याची. तेही अतिशय आकर्षक पद्धतीनं. आणि हीच गरज पुरवण्यासाठी नेक्स्ट हंड्रेड इयर्स या कंपनीने, ‘क्रिएटिव्ह फ़ाउण्टन’ स्कीम बाजारत आणली आहे.

वर्षात ५२ आठवडे असतात. आणि म्हणून हे ५२ आठवडे नीट प्लान केले तर आणि तरच अति झालेल्या मोबाइल मार्केटिंगच्या स्पर्धेत आपण उतरू शकू आणि तग धरून राहू शकू. दर एकाआड एक गुरुवारी आम्ही एक व्हिडिओ, एक इन्फ़ोइमेज / माहितीपर इमेज आणि २०० अक्षरांचा छोटा लेख तयार करु. यात काय असेल ते तुम्ही ठरवायचं, आम्ही असूच म्हणा मदतीला.

अतिशय कमी साइजचे ८०० kb पासून ते २ mb / ३ mb च्या या कलाकृती तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना पाठवायच्या. हा डेटाबेस तुमचा असेल. आम्ही डेटाबेस विकत नाही, कारण ती स्वत:ची केलेली फसवणूक आहे. तुमच्याकडे सुरुवातीला भले ५ लोकांचे नंबर असू दे. ते हळूहळू वाढतील. वाढतीलच.

इतर मिडीयामध्ये एकदा जाहिरात गेली की गेली. तो बाण पुन्हा येत नाही. पुन्हा नवीन बजेट, नवीन डिझाईन… इथे मात्र १ लाख २० हजारात तुम्ही आख्खं वर्षभर प्रयोगही करू शकता, टेस्टिंगही करू शकता आणि तुमची स्ट्रटेजी बदलूही शकता.

आम्ही जे क्रिएटिव्ह तुम्हाला देऊ ते ‘हाय रेझोल्युशनचे’ असणारेत. त्यामुळे डिझाईन तुम्हाला फारच आवडल्यास तुम्ही त्याचं प्रिंटिंगपण करू शकता, टीव्हीवर पण दाखवू शकता. ३१ जानेवारीपर्यंतच आणि पहिल्या २५ क्लायण्टपुरती ही स्कीम मर्यादित असेल. तुम्ही वेळ घ्या, विचार करा आणि पटलं तर नक्की संपर्क करा.

Likes(0)Dislikes(0)

Comments are closed.