Creative Monsoon
1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (3 votes, average: 9.67 out of 5)
Loading...Loading...
Utility :
-----
Category :
Exclusive Schemes
Language :
Marathi, Hindi, English
Business Type:
SME
Product Value :
INR. 3,00,000 Only For One Year
Intensity & Scope :
----
Preservative value :
-----
Personalisation of Content:
Not Possible

पाउस कसा हवाहवासा वाटतो ना ?

ग्राहकांचं पण तसंच असतं नाही का ? मंजे आपण मस्तपैकी रुटीन ऑर्डर्समधे असावं आणि अचानक काही कळायच्या आत नव्या गिऱ्हाईकांच्या सरसर सरसर एकामागोमाग एक ऑर्डर्स येत जाव्यात, नि आईची जशी धावपळ उडते ना, अचानक आलेल्या पावसात दोरीवर वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी… तशीच आपलीही धावपळ व्हावी….. पण हे सुखस्वप्न एखाद वेळेस भरल्यापोटी ठीक आहे. ही अशी तारांबळ धंद्यात उडणं म्हणजे तुम्हाला तुमच्या शक्तीचा पुरेसा अंदाज ‘नसणं’ समजलं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही खूप फोकस्ड पद्धतीने तुमच्या ग्राहकांशी जोडले जायला हवं. ही आता काळाची गरजही झालीय म्हणा. मोबाईल मिडिया तुम्हाला काही गोष्टींचा अंदाज काळाआधीच घेऊ देतो. उदाहरणार्थ जर एखादा चित्रपट खरंच यशस्वी होणार आहे याचा अंदाज आज Whats App आणि इतर सोशल मिडिया साईट्सवरून यायला लागला आणि तुमचं जर कपड्याचं दुकान असेल तर तुम्ही त्या चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी प्रोमोजमध्ये दिसणाऱ्या कपड्यांच्या डिझाइन्सवरून काही नवीन कपडे Launch करू शकता. हे आजवर शक्य झालं नसतं. पण मोबाईल मिडिया तुम्हाला ही संधी उपलब्ध करून देतोय. थोडक्यात पाउस यायच्या आधीच आई आपल्याला दोरीवरचे कपडे काढून आण म्हणून ओरडत असते तसंच काहीसं !

पेराल तेच उगवेल

आपण नक्की काय करतो म्हणून आपल्याकडे गिऱ्हाईक येतं ? हा प्रश्न खरंतर खूपच ‘अनाकलनीय’ आणि ‘गरज नसलेला’ जरी वाटत असला तरी मोबाईल मिडीयाच्या ‘क्रिएटिव्ह मॉन्सून’ स्कीमसाठी  खूपच महत्वाचा आहे. प्रश्न फक्त ३ लाख रुपयांचा नाहीच्चे ! अतिमहत्त्वाचा प्रश्न हा आहे की परस्पर विश्वास कमी होत चालल्या आजच्या जगात, ‘स्वत:चा खास’ कस्टमर बेस टिकवायचा कसा आणि त्यासाठी काय करायचं ? आज तुम्ही एखादी क्वालिटी गोष्ट विकता किंवा विकत घेता तेव्हा ‘क्वालिटीचं कौतुक शून्य असतं, कारण या स्पर्धेच्या जगात तुम्ही क्वालिटी दिली नाही की साम्पालातच म्हणून समजा. तुम्ही त्याव्यतिरिक्त काय देता हे अधिक महत्वाचं आहे. आणि म्हणून क्रिएटिव्ह मॉन्सून स्किम तुम्हाला संधी देतेय बिझनेस व्यतिरिक्त तुमच्या ग्राहकाशी दोन गोष्टी शेअर करण्याची संधी. उदाहरणार्थ, जर तुमचा चप्पल बूट विकायचा धंदा असेल तर तुम्ही असा एक मेसेज पाठवू शकता : पृथ्वीवर माणसाच्या पायाच्या दोन मुख्य जाती आहेत. पहिली इंडो कौकेशिअन आणि दुसरी इंडो युरोपिअन. आपण भारतीय पहिल्या जातीत मोडतो. या आणि अश्या विविध इन्फो-क्रिएटिव्ह मेसेजमुळे तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जातोच शिवाय तुम्ही पेरलेला हा संवाद ‘निश्चित गिऱ्हाईकाच्या रूपाने उगवतोच.

थेंबे थेंबे तळे साचे

एकेक ग्राहक जोडत पुढे जावं लागतंय. त्याच्या सगळ्या इच्छा, अपेक्षा कम्फ़र्टेबल बजेटमध्ये बसवून द्याव्या लागतायत. मुळात मार्केटिंग कम्युनिकेशन प्रचंड ‘फोकस्ड’ ‘क्रिस्पी’ आणि ‘मनोरंजन’ करणारं असावं लागतंय. या सगळ्यासाठी खरंच ‘क्रिएटीव्हिटिचा’ पाउसच पडायला हवा. हा क्रिएटिव्ह पाउस अर्थातच काळवेळ यांचं बंधन पाळणारा हवा. नाहीतर ‘तुमचा लोकांना कंटाळा’ यायला लागेल. ई कॉमर्स वेबसाईट्सच्या जमान्यात तुम्ही जर ‘FMCG डीलर असाल तर तुम्हाला नेमकं लक्षात आलंच असेल. जोवर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने संवाद वाढवत नाही तोवर तुमची गरज निर्माण होत नाही. वर्षभर जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या मोबाईल मार्केटींगच्या उपक्रमांमधून लोकांसमोर जाता तेव्हाच तुम्ही नकळत ग्राहकांच्या विचार करण्यातला एक भाग बनून जाता. जर तुम्ही सर्विस इंडस्ट्री असाल, उदाहरणार्थ, ऑटोमोबाईल गारेज. तर तुम्ही सर्व्हिसिंग करता मंजे नक्की काय काय करता याचा एखादा छोटा व्हिडिओ किंवा, तुमच्याकडून गाडी घेऊन गेल्यानंतर घ्यायची काळजी तुम्ही इमेजेस स्वरूपात पाठवली तर जोडला जाणारा ग्राहक अधिक विश्वासाने पुढच्या वेळी तुमच्याकडे येतोच, पण सोबत अजून एकाला घेऊन येतो.

थेंब संवादाचे, रंग जीवनाचे

जोवर संवाद मजबूत होत नाही तोवर तुम्ही लोकांना ‘पर्दे के पीछे रहनेवाले’ कलाकार असल्याचा फील येत राहील. याचं ताजं उदाहरण आपण २०१४ लोकसभा निवडणुकीत पाहिलं आहेच. नरेंद्र मोदींच्या प्रचाराला खरा हातभार लावला तो सर्व सामान्य जनतेच्या संवादातूनच. या संवादानंच त्यांची एक विशिष्ट प्रतिमा उभी राहली. आपल्या धंद्याच्या बाबतही हीच परिस्थिती असते. खास करून जेव्हा स्पर्धा अतिशय तीव्र होत जाते, तेव्हा ब्रांड किंवा प्रॉडक्टपेक्षा त्याच्याशी निगडीत इतर गोष्टींचीच चर्चा जास्त होते. उदाहरणार्थ, औरंगाबादमध्ये एकाच दिवशी १०० मर्सिडीज गाड्या विकल्या गेल्या, तेव्हा मोबाईल मिडीया फार काही तेजीत नव्हता. पण तरीही चर्चा मात्र मर्सिडीजच्या क्वालिटी किंवा नव्या फीचर्सपेक्षा १०० गाड्या एकत्र, एकदम विकल्या कश्या गेल्या यावरच झाली, आजही होते. म्हणजेच तुम्ही बॉलबेअरिंग बनवणारे जरी असलात आणि काही विशिष्ट ठराविक लोकच तुमचे गिऱ्हाईक असले तरी तुम्ही मोबाईल मीडियाद्वारे बॉलबेअरिंगबद्दल चटपटीत गोष्टी सर्व सामान्यांपर्यंत पोहचवू शकता ज्याचा परिणाम लगेच नाही पण कालांतराने कळायला लागेल. समाजात तुम्हाला बॉलबेअरिंग मधला आघाडीचा उद्योजक म्हणून प्रतिष्ठा मिळण्यात याचे रुपांतरही सहज होईल. कारण तुम्ही स्वत:भोवती मोबाईल मीडियाद्वारे इंटरेस्टिंग glamour उभं केलेलं असतं. थोडक्यात धंद्यातली छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी अचिव्हमेंट, खबर तुमच्या सामान्य ग्राहकापर्यंत मोकळेपणाने पोहोचेल. तरच तुम्ही ‘पाणी’ जरी विकत असलात तरी त्याच्यात ‘आपलेपणाची चव’ जाणवेल. आणि ग्राहक म्हणेल, मला ‘याच’ ब्रांडचं मिनरल वॉटर हवंय.

Likes(0)Dislikes(0)

Comments are closed.