खर्च रुपये ५५०००/-
धंदा योग्य चालूये. मग मला मार्केटिंगची काय गरज ?
कभी कभी प्रॉब्लेम बताके तो नही आता जनाब !
मोबाईल मिडिया हा केवळ प्रसिद्धीसाठी नाही हे सिद्ध करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. समजा तुमचा पाण्याच्या tanker चा व्यवसाय आहे, आणि सध्या परिसरात साथीच्या रोगांची लाट आहे. अश्यावेळी हमखास तुम्हाला हाउसिंग सोसायट्यांमधल्या नागरिकांचा राग सहन करावा लागतो. कारण पाणी दुषित असेल तर ते तुम्ही स्वच्छ करायला हवं असा त्यांचा समाज असतो. आणि दुसरीकडे पाणी उपसून ते सोसायट्यांमध्ये नेण्याचं महाकर्मकठीन काम तुमचं तुम्हालाच माहित असतं. अश्यावेळी परिस्थिती गंभीर असेल तेव्हा इंटरेस्टिंग पद्धतीने तुम्ही पाणी कसं उपसता आणि कसं पोचवता याचे व्हिडीओ किंवा स्लाईडशो तुम्हाला मोबाईल मीडियाद्वारे पोहोचवता येतील. आणि पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा tanker ची खूप जास्त गरज नसेल तेव्हा पाणी घरी स्वच्छ, शुद्ध करून कसं प्यावं याची माहिती तुम्हाला देता येईल. तुम्ही जर दुष्काळग्रस्त भागात किंवा पंढरीच्या वारीला सेवा म्हणून tanker पुरवत असलात तर तुमची समाजसेवाही लोकांना दाखवता येईल आणि कभी कभी बेवजह उमडनेवाला गुस्सा समयसे पहले आप ठंडा कर सकतेहो.
मोबाईल मिडीयामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो.
समजा तुमचा power backup चा व्यवसाय आहे, आणि कभी KABHI स्कीम मध्ये तुम्ही मार्च,एप्रिल, मी हे तीन महिने वापरायचे ठरवले आणि आम्ही काहीतरी भन्नाट क्रिएटिव्ह तुम्हाला बनवून दिले तर एखाद दिवशी अचानक सर्व रस्ते बंद झाल्याने वैतागलेला कस्टमर तुमची क्लिप आठवून तुम्हाला फोन करेल तेव्हा अर्थातच अचानक धनलाभ होणारच. कारण आपण चान्सेस वाढवले. डोंगरावर गेलं तर बापजन्मात मासा मिळणार नाही. त्यापेक्षा नदीत पोहत राहेल तर मासा मिळण्याचा चान्स तरी तयार होतो. तेव्हा कभी KABHI ही स्कीम क्रिकेटमधल्या पार्ट-टाईम बॉलरसारखी आहे. अचानक मोठी विकेट काढून देणारी.

