Sahaj 15000
1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (1 votes, average: 5.00 out of 5)
Loading...Loading...
Utility :
Personal Touch
Category :
Economy Schemes
Language :
Marathi, Hindi, English
Business Type:
Individual
Product Value :
INR. 15,000 Only For One Year
Intensity & Scope :
Very Low, Long Term
Preservative value :
At least a week
Personalisation of Content:
Not Possible

तुम्ही नाही म्हणूच शकत नाही

वर्षाला १५००० रुपये खर्च करा आणि मिळवा इफेक्टिव्ह मोबाईल क्रिएटिव्हज्

परवडणारा दर : प्रयोगाची संधी.

खरंय ! १५००० रुपये वर्षाला म्हणजे अवघे १२५० रुपये महिना. या १२५० रुपयात तुम्ही मोबाईल मीडियाद्वारे तुमच्या सर्वात जवळच्या कस्टमर्सपर्यंत पोहोचायला सुरुवात करा. त्यांच्याशी काय बोलायचं ? त्यांच्या मोबाईलवर काय पाठवायचं हे तुमचं तुम्हीच ठरवा आणि आम्हाला सांगा. आमही तुम्हाला देऊ चकचकीत आकर्षक कलाकृती. दोन-तीन महिन्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सहज म्हणून सुरु केलेला हा मोबाईल मार्केटिंगचा हा उपक्रम चांगला response देतोय. जर तुम्ही इन्शुरन्स एजंट असाल, पिग्मी बँक एजंट असाल, न्हावी, शिंपी, इलेक्ट्रिशिअन किंवा प्लंबर असाल तर तुम्हाला तुमच्या या १५००० चा उत्तम परतावा मिळेल यात आम्हाला कोणतीही शंका नाही.

कस्टमर्ससोबत नातं जोडा

म्हटलं तर हातावरचं पोट. म्हटलं तर इकडून तिकडून ओळखीनं काम मिळण्याचा राजमार्ग हा तुमचा धंदा करण्याचा pattern असेल तर तुम्हाला तुमच्या कस्टमरसोबत खूपच जवळचं नातं जोडावं लागत असेल. सणासुदीला शुभेच्छा असोत किंवा नवीनच केलेल्या चांगल्या कामांची पब्लिसिटी सतत करत करत राहिलात तर तुमचे कस्टमर्स तुमच्या कुटुंबाचाच एक भाग बनतील यात शंका नाही. शिवाय आपण बिझी आहोत, म्हणजे आपल्याला चांगलं काम येतंय. नवनवीन लोकं आपल्यावर विश्वास ठेवताहेत हेसुद्धा यानिमित्तानं आपण लोकांपर्यंत पोह्चवू शकतो.

इथून पुढे मोबाईल मिडियाचं महत्व वाढणारंच

३जी, ४जी आणि घराघरात येणाऱ्या वायफायमुळे इथून पुढच्या काळात स्मार्ट मोबाईल प्रत्येकाच्याच हातात दिसणार यात शंका नाही. याचाच अर्थ कामाचं नियोजन करणं देखिल अधिकाधिक सोपं होत जाणार. विचार करा, जर एका क्लिकवर तुमच्याबद्दलची माहिती समोरच्याला मिळत असेल आणि तीही मनोरंजक स्वरूपात तर हा चान्स का सोडायचा ? आज गुंतवलेले १५००० रुपये हे पुढच्या ३६५ दिवसांची कमाई असणारेत हेच सत्य आहे.

Likes(0)Dislikes(0)

Comments are closed.