प्रगतीचा एकेक इंच महत्वाचा
२५००० रुपयांमध्ये तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा रहा एक पाउल पुढे.
शोध तुमचे प्रामाणिक ग्राहक.
तुम्हाला हसू आलं असेल हे वाचल्यावर. कारण प्रामाणिक ग्राहक राहिलाच कुठेय असं वाटत असेल ना तुम्हाला ! पण खरं सांगू ? आमचा अभ्यास सांगतो की बदलत्या कालानुसार, बदलत्या टेक्नोलॉजीचा योग्य वापर केला, तर आयत्या वेळी येणारे ग्राहक आणि तुमच्याचकडे यायचं असं ठरवून येणारे ग्राहक यात तुम्ही फरक करू शकाल. तुम्हीच सांगा बरं ? जर तुमचं केकचं दुकान असेल आणि तुमचा ग्राहक वाढदिवसाच्या एक आठवडा आधीच तुम्हाला केकची ऑर्डर आणि advance देत असेल तर पुढच्या वेळी तुम्ही स्वत:हून त्याना फोन कराल ना ? पण केक नेल्यानंतर पुढचं वर्षभर तुमचा आणि त्यांचा संबंध फक्त अधनंमधनं एखादी किरकोळ खरेदी करण्यापुरताच मर्यादित ठेवणार का तुम्ही ? का नाही भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिरंगी पेस्ट्री पाठवणार तुम्ही त्याना ? किंवा का नाही तुमचा धंदा एखाद्या महिन्यात वाढला तर एखादी सुंदर नवीन बनवलेली कविता पाठवायची त्यांना ? मोबाईल मिडीया हा असा प्रत्येक क्षणाला तुम्हाला मदत करेल, तुमचा प्रामाणिक ग्राहक शोधण्यासाठी.
तुमच्या नवीन उपक्रमाचा गाजावाजा करा
तुम्ही एखादं नवीन हेअर treatment चं मशीन आणलंत तर तुमच्या ब्युटी-पार्लरतर्फे पहिल्या २० जणांना फ्री सर्विस द्या. पण त्या बदल्यात २ प्रश्न मोबाईलवरून पाठवा. उदाहरणार्थ, केस पांढरे का होतात ? आणि शिकेकाई हे फळ आहे, की बी आहे की खोड आहे की मूळ आहे ? लक्षात घ्या मोबाईल मिडीयाचा वापर तुम्ही नाही केलात तर कुणीच करणार नाहीये. आणि मग तसं असेल तर तुमच्या चांगल्या कामाचा गाजावाजा तुम्ही नाही करायचा तर कोण करणार ? तेव्हा तुमच्यामधला स्पार्क ग्राहकांपर्यंत पोचवत रहा.
ग्राहकांना जोडा एकमेकांशी
ज्या अर्थी तुम्ही महिन्याला साधारण २००० हजार रुपये मोबाईल मिडियावर खर्च करण्याची तयारी दाखवताय त्या अर्थी नक्कीच तुमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचा response चांगलाच असणार. मग समजा तुम्ही सगळ्यांचे ब्लड ग्रुप लिहून घेतलेत आणि तुमच्या एरियात जर एखाद्या संस्थेचा ब्लड डोनेशन कॅम्प असेल तर तुमचा क्रिएटिव्ह मेसेज जाऊ दे की सगळ्याना. तुमचं दुकान जरी हार्डवेअरचं असलं तरी तुमच्याबद्दल लोकांच्या मनात soft कॉर्नर राहीलच. एखाद्या ग्राहकाला जर त्याचा जुना लोखंडी बेड विकायचा असेल तर तुमच्या ग्राह्कांच्या सर्कलमध्ये एक क्रिएटिव्ह व्हिडिओ जाऊ दे. बघा किती फरक पडेल ते. थोडक्यात काय तर तुम्ही तुमचा माल विकताना अजून काय देता हेच महत्वाचं आणि त्यासाठी मोबाईल मिडियाइतकं साधं – सोपं – सहज दुसरं काय आहे ? सांगा बघू तुम्हीच ?

