बिंदास कॉलर ताठ ठेवा
वर्षाचे ३५००० रुपये मोबाईल मार्केटिंगसाठी जास्त आहेत का ?
रिटेल व्यावसायिक म्हणून तुम्हाला सतत फ्रेश आयडीया आणि नवीन कल्पना हव्या असतात. ह्या घ्या..
क्रिएटिव्ह सिरीजचं प्लानिंग करा आणि तुमची सर्व्हिस त्यातून दाखवा.
तुमचं मोठं मिठाईचं दुकान असेल आणि तुम्ही नवी काजू बर्फी आणताय तर मग त्या काजूच्या आवाजात सांगा सगळ्यांना कशी बनवलीत बर्फी ते. किंवा चक्क तुमच्या मागच्या पिढ्यांचा इंटरेस्टिंग इतिहास कळू द्या सर्वांना. तुम्ही कोण कुठले ? या व्यवसायात कसे आलात ? तुमच्या पणजोबा, आजोबा, वडील यांच्या संघर्षाचं चित्र सर्वांसमोर उभा करा. थोडक्यात काय तर आकर्षक पद्धतीने तुमच्या personalityला लोकांसमोर मांडा. तुमचा आणि तुमच्या धंद्याचा संघर्ष मुळात इतका क्रिएटिव्ह असतो की त्यासाठी तुम्हाला इकडेतिकडे पहायची गरजच पडत नाही. आणि आम्ही आहोतच की मसाला लावून, खुलवून सगळं सांगायला. या अश्या क्रिएटिव्हजचे दोन फायदे आहेत. पहिला फायदा तुमच्या नकळत तुम्ही स्वत: रोल मॉडेल व्हायला लागता आणि दुसरा फायदा म्हणजे अश्या क्रिएटिव्हजमधून ग्राहकाला नवी संस्कृती, वागण्याबोलण्याची वेगळी पद्धत, आणि विचार करायला मुद्दे मिळतात. तुमचा माल विकला जाण्याइतकच तुमचं अस्तित्व कळणं महत्वाचं आहे.
जे तुम्ही समोरासमोर बोलू शकत नाही ते बोलून घ्या.
उदाहरणार्थ तुम्हाला आलेले काही चमत्कारिक किंवा वाईट अनुभव तुमच्या ग्राहकांशी शेअर करा. चमत्कारिक अनुभवातून करमणूक आणि मनोरंजन नक्कीच होईल. आणि वाईट अनुभवातून शिकायला खूप मिळेल. आणि पुढच्या वेळेस ग्राहक अधिक योग्य रीतीने तुमच्यापाशी येईल. तुम्ही कोचिंग क्लासचे संचालक असाल तर काही टवाळखोर पोरांचे अनुभव सांगून, सर्वच पालकांना तुम्ही धोक्याचा इशारा देऊ शकता आणि पोळीभाजी केंद्र चालवत असाल तर वाढत्या महागाईचा तुमच्यावर होणारा परिणाम योग्य रीतीने सांगू शकाल. शेवटी मोबाईल मिडीयाचा फायदा हाच आहे, की तुमच्या ग्राहकांचं तुम्ही वर्गीकरण करू शकता आणि सगळ्यात जवळचे, लांबचे, नवीन जोडले गेले असे ग्राहक वेगवेगळे करून त्यांच्याशी तुमच्या सोयीनुसार संबंध वाढवू शकता किंवा सुधारू शकता.
फ्रेश आयडिया रोज रोज आणणार तरी कुठून ?
विचार करा की आजवर एकदा तरी तुम्ही तुमच्या ग्राहकांनाच तुमची जाहिरात बनवायला सांगितलीय का ? नाही ना ? मग ही सुवर्णसंधी वाया का घालवायची ? मोबाईल मिडियावरून एक भन्नाट स्पर्धा आयोजित करा आणि ग्राहकांनाच सांगा की, जो आमच्या नवीन laptop च्या दुकानासाठी किंवा सिझनच्या पहिल्या हापूस आंब्यासाठी बेस्ट गाणं लिहून देईल त्याला एक १ TB ची हार्ड-डिस्क फ्री किंवा एक आंब्याची पेटी फ्री. तुमच्या अपेक्षेपेक्षा हजारपट मोठा response येऊ शकतो. विचार करा तुम्हाला नवीन क्रिएटिव्ह मिळालं, ग्राहकांना नवं काहीतरी मनोरंजन आणि फायदा मिळाला आणि तुमची पब्लिसिटी झाली ती वेगळीच. थोडक्यात मोबाईलमुळे तुम्हाला लोकांच्या आवडीनिवडीही कळाल्या आणि रिसर्चही झाला. रिटेल मार्केटमध्ये यापेक्षा अजून कोणत्या चमत्काराची तुम्ही करणार ?

